
ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची भेट द्यावी: किशोर भापकर
जीवनात आई वडिलांचा आशीर्वाद मोठा असतो
बारामती वार्तापत्र
या जगातील प्रत्येक जण जीवनात वयानुसार ज्येष्ठ होणार आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या परंतु त्यांना प्रेम द्या, प्रत्येक अपत्यास त्यांनी खूप मोठे केले आहे त्यामुळे त्यांना सन्मानाची वागणूक द्या,दुर्लक्ष करू नका त्यांचे आशीर्वाद घ्या व कायमस्वरूपी भेट म्हणून सन्मान द्या असे प्रतिपादन किर्लोस्कर फेरस् कंपनीचे वरिष्ठ अधिकारी किशोर भापकर यांनी केले.
बुधवार दि.०९ एप्रिल रोजी बोरावके वृद्धाश्रम ज्येष्ठ नागरिक निवास तांदुळवाडी या ठिकाणी किशोर भापकर यांचा वाढदिवस निमित्त ज्येष्ठ नागरिक निवास या ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक निवास चे विश्वस्त डॉ अजिंक्य राजे निंबाळकर, डॉ सुहासिनी सातव, किर्लोस्कर फेरर्स कंपनीचे अधिकारी अभिजीत जगताप, राजेश जोशी ,सौमित्र ठोंबरे, नारायण भापकर ,व्यवस्थापक राजेश शेळके आदी मान्यवर उपस्तीत होते.
जीवनात आई वडिलांचा आशीर्वाद मोठा असतो, त्यांचा आदर करणे ही संस्कृती आहे व ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे किशोर भापकर यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक निवास च्या विविध दैनंदिन कार्यक्रम व सेवा सुविधा बदल डॉ सुहासिनी सातव यांनी माहिती दिली. डॉ अजिंक्य राजे निंबाळकर यांनी उपस्तितांचे स्वागत केले.ज्येष्ठ नागरिक यांनी आपल्या भावना व्यक्त करून वाढदिवस निमित्त शुभेच्छा दिल्या.गणेश शेळके यांनी सूत्रसंचालन व आभार अभिजित जगताप यांनी मानले