ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व. डॉ. वर्धमान कोठारी जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत,बारामतीत शनिवारपासून मोफत आरोग्य तपासणी शिबिर
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी 9225536392

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व. डॉ. वर्धमान कोठारी जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत,बारामतीत शनिवारपासून मोफत आरोग्य तपासणी शिबिर
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी 9225536392
बारामती वार्तापत्र
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व. डॉ. वर्धमान कोठारी जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत शनिवार (दि. 7) ते रविवार (दि. 15) मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. उज्ज्वला कोठारी व शेखर कोठारी यांनी दिली.
या आठवड्यामध्ये बहिरेपणा, स्त्रीरोग, वंध्यत्व समस्या, सांधेदुखी, वातविकार, दमा, अस्थमा, मुळव्याध, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायराईड, पक्षघात, छातीचे आजार, त्वचारोग, स्थुलत अशा आजारांनी ग्रस्त रुग्णांची शिबिरात तपासणी होणार आहे.
ऑडिओलॉजिस्ट डॉ. रवीशंकर नवले, डॉ. उज्ज्वला कोठारी, डॉ. संतोष शहा, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. राजीव खरे, डॉ. केतन अंबर्डेकर, डॉ. अंजली सोरटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुप दोभाडा, डॉ. आनंद गवसणे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. मीनल गवसणे, डॉ. सलोनी चंकेश्वरा या शिबिरात तपासणी, उपचार व मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळी अकरा ते दुपारी एक व संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वेळ घेऊन तपासणीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी 9225536392 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.