तामिळनाडू मधील राष्ट्रीय स्काऊट जांबोरी स्पर्धेत ज्ञानसागरचा डंका
तामिळनाडू मध्ये राष्ट्रीय स्काऊट जांबोरी स्पर्धेत ज्ञानसागरच्या विद्यार्थ्यांनी केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

तामिळनाडू मधील राष्ट्रीय स्काऊट जांबोरी स्पर्धेत ज्ञानसागरचा डंका
तामिळनाडू मध्ये राष्ट्रीय स्काऊट जांबोरी स्पर्धेत ज्ञानसागरच्या विद्यार्थ्यांनी केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
बारामती वार्तापत्र
२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान तामिळनाडू येथील डायमंड राष्ट्रीय स्काऊट-गाईड जांबोरी-२०२५ उत्साहात पार पडली.
या राष्ट्रीय जांबोरीत संपूर्ण देशभरातून २७ राज्य व ०४ देशातील विद्यार्थी व शिक्षक या स्पर्धेत सहभागी झाले होते.या जांबोरीसाठी संपुर्ण पुणे जिल्ह्यातून ५६ स्काऊट व ५ गाईड यांची निवड करण्यात आली होती.
यामध्ये बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, सावळ या शाळेतील १६ विद्यार्थी सहभागी होते.या राष्ट्रीय स्काऊट जांबोरी संचलन, शोभायात्रा, ग्रुप डान्स,फुड प्रदर्शन, कलर पार्टी परेड अश्या विविध स्पर्धा झाल्या. यामध्ये कलर पार्टी परेडचे ज्ञानसागर गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट सादरीकरण केले.
यामध्ये करण काळे , सार्थक माने, संस्कार झगडे, सुजल जाधव, सिध्देश झगडे,प्रविण दराडे,श्रेयश झगडे,दक्ष कांबळे , संस्कृती झगडे, स्वरा टकले,वैष्णवी शिंदे,तृप्ती शेलार,श्रेया सुतार, संस्कृती माने, अंकाक्षा बंडगर, गायत्री राठोड या सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांला दहावी बोर्डाच्या परीक्षेत १० वाढीव गुण मिळणार आहेत.आशा राष्ट्रीय स्काऊट जांबोरीसाठी संपुर्ण महाराष्ट्रातून ज्ञानसागर गुरुकुल च्या १६ विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यामध्ये या शाळेचे,विद्यार्थ्यांचे व संस्थापक अध्यक्ष प्रा.सागर मानसिंग आटोळे व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांचे कौतुक करण्यात येत आहे.