क्रीडा

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा खेळाडू श्री संतोष कचरे याची इराण येथे होणाऱ्या पश्चिम आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

इयत्ता अकरावीपासूनच तो महाविद्यालयात बेसबॉल चे प्रशिक्षण घेत होता.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा खेळाडू श्री संतोष कचरे याची इराण येथे होणाऱ्या पश्चिम आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

इयत्ता अकरावीपासूनच तो महाविद्यालयात बेसबॉल चे प्रशिक्षण घेत होता.

बारामती वार्तापत्र 

अनेकांत  एज्युकेशन सोसायटीच्या  तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा खेळाडू  संतोष कचरे याची इराण या ठिकाणी होणाऱ्या पश्चिम आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेली आहे. हा संघ दिनांक १५ ते २२ मे २०२५ दरम्यान इराण या ठिकाणी खेळणार आहे.

या पूर्वी देखील संतोष कचरे याने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत तीन वेळा सुवर्णपदक तसेच अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून खेळत असताना दोन सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त केलेले आहे.

इयत्ता अकरावीपासूनच तो महाविद्यालयात बेसबॉल चे प्रशिक्षण घेत होता. कनिष्ठ महाविद्यालयातर्फे देखील शालेय व संघटनेच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते. विपरीत परीस्थितीतही त्याने बेसबॉल खेळावरील आपली श्रद्धा कायम ठेवली. अतिशय गरीब कुटुंबातून मेहनतीने संतोषने आजपर्यंत बेसबॉल या खेळात प्रगती केलेली आहे.

संस्थाचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी वेळोवेळी अनेक स्पर्धांसाठी संतोषला मदत केली आहे. जिद्द, चिकाटी व खेळातील सातत्य यामुळे त्याने आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय संघात स्थान मिळवलेले आहे.

त्याला डॉ.गौतम जाधव, प्रा.अशोक देवकर, प्रा.सुहास डेरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संतोषच्या या यशाबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!