बारामतीत मराठा वधु वर परिचय मेळावा संपन्न
४७७ मुलांचे बायोडाटा एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्यात आले तर ३८० मुलींचे बायोडाटा एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आले

बारामतीत मराठा वधु वर परिचय मेळावा संपन्न
४७७ मुलांचे बायोडाटा एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्यात आले तर ३८० मुलींचे बायोडाटा एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आले.
बारामती वार्तापत्र
अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती च्या वतीने आज जिजाऊ भवन बारामती या ठिकाणी भव्य मराठा वधु वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला प्रचंड असा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी उपवर वधू घटस्फोटीत विधवा विधुर व त्यांचे पालक उपस्थित राहिले होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करून तसेच अण्णासाहेब पाटील व स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि महाराष्ट्र गीत तसेच राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
तसेच बारामती नगरीचे नगराध्यक्ष श्री सचिन सातव पंचायत समितीचे सभापती श्री किरण तावरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष श्री किरण इंगळे बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री धनंजय जामदार राजेंद्रजी खराडे, मराठा सेवा संघ बारामती चे प्रदीप शिंदे,विजय तावरे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी ४७७ मुलांचे बायोडाटा एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्यात आले तर ३८० मुलींचे बायोडाटा एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे यश म्हणजे या ठिकाणी एक घटस्फोटीत तर दोन नव वर वधू यांचे लग्न जमले असून हीच या कार्यक्रमाची पोचपावती आहे या ठिकाणी घडलेल्या गट चर्चेमधून आणखी लग्न जमण्याची शक्यता आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री संभाजी माने यांनी आपल्या भाषणादरम्यान या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थित पालक व मुला मुलींचे आभार मानले असून दरवर्षी या पद्धतीचा वधु वर परिचय मेळावा एक मे महाराष्ट्र दिनी घेणार असल्याचे सांगितले तसेच २१ कक्ष स्थापन करून प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून मराठा समाजाची कामे मार्गी लावत असल्याचे त्यांनी सांगितले जसे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वधू वर सूचक मंडळ, सारथी, उद्योजक कक्ष स्वयंरोजगार कक्ष प्लेसमेंट व वैद्यकीय मदत कक्ष शैक्षणिक सल्ला मदत कक्ष तरी मराठा समाजाने वरील सर्व प्रकारच्या मदतीकरिता अवश्य आमच्या कक्षाशी संपर्क साधावा असे आव्हान केले आहे तर सचिन सातव नगराध्यक्ष बारामती यांनी उपस्थित मुलमुले यांना या कार्यक्रमाकरिता शुभेच्छा दिल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अनेक प्रकरण बारामती सहकारी बँकेच्या माध्यमातून केल्याचे त्यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाचे आभार बारामती शहराध्यक्ष सौ अर्चनाताई सातव यांनी मांडले






