स्थानिक

नाटक अभिनयात बारामती नगरपरिषदेने तिसऱ्या क्रमांकावर

क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम बारामती येथे संपन्न

नाटक अभिनयात बारामती नगरपरिषदेने तिसऱ्या क्रमांकावर

क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम बारामती येथे संपन्न

बारामती वार्तापत्र

पर्यावरण, दळणवळण व विविध विकास कामांमध्ये प्रथम क्रमांकावर असणारी बारामती परंतु नाटक,अभिनय क्षेत्रात बारामती नगरपरिषदेने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग- विभागीय नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग पुणे यांच्या वतीने दि.११ व १२ फेब्रु.२०२५ रोजी आयोजित पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या पाच जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील अधिकारी कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम बारामती येथे संपन्न झाला.

विविध सांस्कृतिक स्पर्धांपैकी नाटिका या प्रकारामध्ये पुणे विभागास ३ रा क्रमांक मिळाला आहे. यामध्ये बारामती नगरपरिषदेतील अधिकारी कर्मचारी यांनी सदरची नाटिका सादर केली. यामध्ये अश्विनी अडसूळ, संजय चव्हाण, निलम काशिद, आरती खरात, स्वाती सोनवणे, प्रतिभा सोनवणे, हनुमंत गायकवाड व अली मुल्ला यांनी सहभाग घेतला होता. मा.श्री.मनोज रानडे सो.(IAS) आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्या हस्ते बक्षिस मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!