बारामती शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या सुमारे ७०० मीटर अंतरावर पुन्हा घरफोडी; फ्लॅटमधून दोन तोळे सोन्याचे दागिने चोरी
दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या सुमारे ७०० मीटर अंतरावर पुन्हा घरफोडी; फ्लॅटमधून दोन तोळे सोन्याचे दागिने चोरी
दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या सुमारे ७०० मीटर अंतरावर असलेल्या देवराज रेसिडेन्सीमध्ये पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल सोपान काळुंखे हे आपल्या मुलाला केस कापण्यासाठी (कटिंगसाठी) बाहेर घेऊन गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा फायदा घेत घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सुमारे दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, देवराज रेसिडेन्सीमध्ये यापूर्वीही चोरीची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा त्याच इमारतीत चोरी झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून रहिवाशांनी पोलिसांकडून नियमित गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.






