नीर-बारामती रस्त्यावर चारचाकी गाडी- ट्रकचा भीषण अपघात
दोन ट्रॉलीची चाके त्यांच्या अंगावरून

नीर-बारामती रस्त्यावर चारचाकी गाडी- ट्रकचा भीषण अपघात
दोन ट्रॉलीची चाके त्यांच्या अंगावरून
बारामती वार्तापत्र
नीरा- बारामती रस्त्यावर कोऱ्हाळे बुद्रुकनजीक कठीण पूल येथील तुकाईनगरजवळ चार चाकी व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात कार चालक, महिला, बालक गंभीर जखमी झाले आहेत.
वालचंदनगर परिसरातील एक कुटुंब हे कारमधून मांढरदेवी या ठिकाणी काळूबाईच्या दर्शनासाठी बारामती बाजूकडून नीरेकडे निघाले होते.
नीरा बाजूकडून बारामती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्टचा मालवाहतूक करणारा मालट्रक बारामतीच्या दिशेने निघाला होता. हॉटेल रेहाननजीक ट्रकने चुकीच्या बाजूला जात कारला समोरासमोर जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती कळताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी बारामतीला पाठवले. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वडगाव निंबाळकरच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.