इंदापूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी घेतली भाजप नेते हर्षवर्धन पाटील व कुटुंबाची भेट

भेटीदरम्यान अंकिता पाटील ही उपस्थित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी घेतली भाजप नेते हर्षवर्धन पाटील व कुटुंबाची भेट

भेटीदरम्यान अंकिता पाटील ही उपस्थित

इंदापूर : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील व पाटील कुटुंबीयांची भेट घेतली.हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचे काही दिवसांपुर्वी निधन झालं होतं. याच प्रार्श्वभुमीवर पार्थ पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेेट घेतली आहे.

हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ मयुरसिंह पाटील यांच्या मातोश्री अनुराधा अरुणराव पाटील यांचे दि.१८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.यामुळे पार्थ पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांसह मयुरसिंह पाटील व पाटील कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेतली.पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील देखील यावेळी उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button