बारामती एमआयडीसी च्या उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध: डॉ शिवाजी पाटील
उद्योजकांना पोषक वातावरण मध्ये कंपनी चालविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपी सहकार्य

बारामती एमआयडीसी च्या उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध: डॉ शिवाजी पाटील
उद्योजकांना पोषक वातावरण मध्ये कंपनी चालविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपी सहकार्य
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसी मधील उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी व शासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवाजी पाटील यांनी प्रतिपादन केले.
गुरुवार दि.०२ जानेवारी रोजी एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवाजी पाटील यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर च्या बारामती विभागीय कार्यालयास भेट दिली या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी विभागीय चेअरमन शरद सूर्यवंशी , एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर , अधीक्षक अभियंता निलेश मोडवे, कार्यकारी अभियंता विजय पेटकर, उप रचनाकार महेश पाचपुते, उपअभियंता दत्तात्रय गलांडे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे बारामती विभाग चे व्हॉइस चेअरमन शिवाजीराव निंबाळकर, सुशील कुमार सोमानी संचालक मनोज तुपे,सुरेश परकाळे, उद्योजक अजय इंगवले,आदी उपस्थित होते.
बारामती एमआयडीसी मधील फेज १,फेज२ मधील रस्ता, लाईट,पाणी व इतर तांत्रिक समस्या,कटफळ चौक येथील वाहतूक समस्या,पर्यावरण च्या दृष्टीने कंपनी आवारातील झाडे आदी बाबत सकारत्मक चर्चा करण्यात आली.
उद्योजकांना पोषक वातावरण मध्ये कंपनी चालविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपी सहकार्य करू अशी ग्वाही डॉ. शिवाजी पाटील यांनी याप्रसंगी दिली स्वागत चेअरमन शरद सूर्यवंशी यांनी केले .