क्राईम रिपोर्ट

धक्कादायक : “त्या’ मुलीची ब्लॅकमेलिंगमुळे बारामतीतील प्रियकराने केली आत्महत्या! …युवतीवर गुन्हा दाखल

लग्न झाल्यानंतरही हे संबंध सुरुच होते.

धक्कादायक : “त्या’ मुलीची ब्लॅकमेलिंगमुळे बारामतीतील प्रियकराने केली आत्महत्या! …युवतीवर गुन्हा दाखल

लग्न झाल्यानंतरही हे संबंध सुरुच होते.

क्राईम;बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील कसबा येथील एका तरुणाने केलेल्या आत्महत्येमागे मुलीने केलेले ब्लॅकमेलींग कारणीभूत असल्याचे उघड झाल्याने संबंधित तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमीर शकूर काझी याने १९ मे रोजी आत्महत्या केली होती.एका युवतीशी असलेल्या अनैतिक संबंधातून ती बलात्काराचा गुन्हा दाखल
करण्याची धमकी देत असल्याने या युवकाने आत्महत्या केल्याच्या फिर्यादीवरून हा संबंधित युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, आमीर शकूर काझी याचे लग्नानंतरही एका तरुणीशी संबंध होते. त्यातून त्याच्या घरी वाद होवू लागल्यामुळे त्याला या तरुणीशी संबंध संपवण्याची ताकीद कुटुंबीयांनी दिली. तसेच त्याला घरातून वेगळे राहण्यास सांगितले. या दरम्यान, आमीरने या युवतीशी संबंध तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र ही युवती त्याला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती.

आता आमीरच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनूसार बारामती शहर पोलिसांनी संबंधित युवतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D