स्थानिक

बारामती बाजार समितीचे जळोची सुविधा केंद्रावरून १८० टन आंबा निर्यात

४८५ टन आंबा ऑस्ट्रेलिया आणि युरोप या देशात निर्यात

बारामती बाजार समितीचे जळोची सुविधा केंद्रावरून १८० टन आंबा निर्यात

४८५ टन आंबा ऑस्ट्रेलिया आणि युरोप या देशात निर्यात

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांनी उभारलेल्या बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील निर्यात सुविधा केंद्र बाजार समितीचे मार्गदर्शक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार बाजार समिती चालवत आहे.

या जळोची निर्यात सुविधेवरून चालु हंगामात एप्रिल २०२५ अखेर १८० टन आंबा लंडन व अमेरिका येथे निर्यात करणेत आला अशी माहिती सभापती विश्वासराव आटोळे आणि उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली.

या सुविधा केंद्रावरून रेन्बो इंटरनॅशनल प्रा. लि. पुणे यांचे मार्फत दरवर्षी आंबा निर्यात केला जात असुन ज्या शेतक-यांकडे रिशुड्यु फ्री व निर्यातक्षम दर्जाचा आंबा असल्यास अशा शेतक-यांनी रेन्बो इंटरनॅशनल यांचेशी संपर्क साधुन सुविधा केंद्राचा फायदा घ्यावा असे आवाहन निर्यातदार अभिजित भसाळे यांनी केले आहे,बारामती बाजार समिती मार्फत जळोची निर्यात सुविधा केंद्र हे सन २०१४ पासुन चालवित असुन गतवर्षी याच सुविधा केंद्रावरून रेन्बो इंटरनॅशनल मार्फत ४८५ टन आंबा ऑस्ट्रेलिया आणि युरोप या देशात निर्यात केला आहे. रेन्बो इंटरनॅशनलचे अभिजित भसाळे हे शेतक-यांकडुन निर्यातक्षम आंबा खरेदी करून आमगो ब्रॅण्ड या नावाने आकर्षित पॅकींग करून निर्यात करीत आहेत.

या हंगामात एप्रिल २०२५ पासुन आत्ता पर्यन्त लंडन येथे ७५ टन तर १०५ टन अमेरिका, युरोप येथे निर्यात झाला. आंबा उत्पादक शेतक-यांनी रेन्बो इंटरनॅशनलचे सुभाष पवार मोबा.नं. ८८८८७०९६७० यांचेशी संपर्क साधुन निर्यातक्षम मालाची विक्री करता येईल असे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!