
बारामती मध्ये इंडियन डेंटल असोसिएशन ची स्थापना
सूत्रसंचालन डॉ ऋतुजा पिसे यांनी केले.
बारामती वार्तापत्र
इंडियन डेंटल असोसिएशन बारामती शाखेची स्थापना शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी करण्यात आली.
या शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. संग्राम काळे यांची निवड करण्यात आली तसेच सेक्रेटरी डॉक्टर प्रशांत हगारे,, खजिनदार डॉक्टर गौरव पारेख यांची निवड करण्यात आली .
या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्य डेंटल असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉक्टर अजित कदम, डॉक्टर लक्ष्मीकांत बिचले इसी मेंबर महाराष्ट्र राज्य तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अशोक तांबे, मेडिकोज गिल्ड चे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र चोपडे, डॉक्टर वैभव काटे देशमुख अध्यक्ष निमा बारामती शाखा, होमिओपॅथ असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर नीलम कुमार शिरकांडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत व डॉक्टर मोहनचंद पाटील व डॉक्टर आशुतोष आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ऋतुजा पिसे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉक्टर प्रशांत हजारे यांनी केले महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.