बारामती होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ अमोल जगताप, खजिनदार डॉ अमित भापकर व सचिव डॉ सचिन लोणकर यांची निवड
डॉक्टरांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार

बारामती होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ अमोल जगताप, खजिनदार डॉ अमित भापकर व सचिव डॉ सचिन लोणकर यांची निवड
डॉक्टरांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार
बारामती वार्तापत्र
बारामती होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ अमोल जगताप, खजिनदार डॉ अमित भापकर , सह खजिनदार सागर रणवरे , सचिव डॉ सचिन लोणकर,सहसचिव डॉ रुपेश माने
व उपाध्यक्ष पदी डॉ स्मिता बोर्वे, डॉ पल्लवी तावरे , क्रीडा समिती डॉ सागर साळुंखे ,पृथ्वीराज झांबरे, सांस्कृतिक समिती डॉ चेतन जगताप डॉ अभिजीत बारवकर,सहल सचिव श्री संदेश दिवेकर यांची निवड करण्यात आली.
गुरुवार दि.१० एप्रिल रोजी होमिओपॅथिक चे संस्थापक डॉ सॅम्युअल ऍनिमल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सदर निवड करण्यात आली.
होमिओपॅथिक संघटनेच्या वतीने वर्षभरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ अमोल जगताप यांनी सांगितले.
होमिओपॅथिक संघटनेच्या वतीने होमिओपॅथिक डॉक्टरांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे संघटनेचे नवनिर्वाचित खजिनदार डॉ अमित भापकर यांनी सांगितले.
आभार सचिव डॉ सचिन लोणकर यांनी सांगितले.