महिला दिनानिमित्त बारामतीमध्ये कॅन्सर जनजागृतीपर व्याख्यान
सायं. ठिक ६.०० वा. नटराज नाट्य कला मंदीर, तीन हत्ती चौक, बारामती.

महिला दिनानिमित्त बारामतीमध्ये कॅन्सर जनजागृतीपर व्याख्यान
सायं. ठिक ६.०० वा. नटराज नाट्य कला मंदीर, तीन हत्ती चौक, बारामती.
बारामती वार्तापत्र
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मेडिकोज गिल्ड, बारामती आणि भगिनी मंडळ बारामती
यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ७ मार्च २०२५ रोजी सायं. ठिक ६.०० वा. नटराज नाट्य
कला मंदीर, तीन हत्ती चौक, बारामती येथे महिलांमधील कर्करोग (कॅन्सर) ओळख, निदान व
प्रतिबंध या विषयावर पुणे येथील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ. भूषण संजय भळगट यांचे व्याख्यान
आयोजीत करण्यात आले आहे.
अलीकडील काळात महिलांमधील कर्करोगाचे वाढते प्रमाण ही मोठी वैद्यकीय, सामाजिक
आणि आर्थीक समस्या बनू पाहत आहे. वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक उपचारांमुळे या दुर्धर
आजारापासून बचाव होऊ शकतो.
या व्याख्यानामध्ये तोंडाचा कॅन्सर, थायरॉईड व घशाचा कॅन्सर,स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय व अंडाशयाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर या सर्व प्रकारच्या कॅन्सर संदर्भातील अभ्यासपुर्ण माहिती मराठी भाषेतून देऊन शंका निरसन करण्यात येईल.
या वर्षी महिला दिनानिमित्त महिलांसाठी तसेच महिलांची काळजी घेणाऱ्या वडील, भाऊ
पती, दीर, जावई व पुत्र यांनी ऐकावे असे कर्करोग संदर्भातील अतिशय उपयुक्त व्याख्यान
आयोजीत केले आहे.
तरी या विनाशुल्क व्याख्यानाचा लाभ सर्व स्त्री-पुरूषांनी घ्यावा असे आवाहन डॉ. मेडिकोज गिल्ड बारामतीचे विद्यमान अध्यक्ष डॉ. राजेंद्र चोपडे व त्यांचे पदाधिकारी व तसेच भगिनी मंडळ बारामतीचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.