स्थानिक

रब्बी हंगाम संपल्यानंतर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची आवक वाढली

प्रतिक्विंटल 4 हजार रुपये दर

रब्बी हंगाम संपल्यानंतर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची आवक वाढली

प्रतिक्विंटल 4 हजार रुपये दर

बारामती वार्तापत्र

रब्बी हंगाम संपल्यानंतर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध धान्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. बाजार समितीत गुरुवारी (दि. 17) झालेल्या लिलावात लोकवन गव्हाची तब्बल 892 क्विंटलची आवक झाली.

लोकवन गव्हाला किमान 2100 रुपये, तर कमाल 2850 आणि सरासरी 2700 रुपये दर मिळाला.

तसेच 2189 या गव्हाची 595 क्विंटल आवक झाली. या गव्हाला किमान 2500, कमाल 3300 आणि सरासरी 2900 रुपये दर मिळाला. फळे, भाजीपाला यासह मका, गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा आदी भरड धान्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. गेल्या वर्षभरापासून गव्हाचे दर स्थिर आहेत. मात्र प्रतिक्विंटल 4 हजार रुपये दर मिळाला.

गावरान ज्वारीची 417 क्विंटल आवक झाली. गावरान ज्वारीला किमान 2500, कमाल 3900 आणि सरासरी 3100 रुपये दर मिळाला. तर हायब्रीड ज्वारीची 626 क्विंटल आवक झाली. हायब्रीड ज्वारीला किमान 2100, कमाल 3000 आणि सरासरी 2900 रुपये दर मिळाला. बाजार समितीत तांबड्या मक्याची 401 क्विंटल आवक झाली. मक्याला किमान 1700, कमाल 2325 आणि सरासरी 2255 रुपये क्विंटल असा दर मिळाला.

गरडा आणि जाड्या हरभर्‍यांची विक्रमी आवक झाली. गरडा हरभर्‍याची 504 क्विंटल आवक झाली. यासाठी किमान 4700 कमाल 5516 आणि सरासरी 5575 रुपये दर मिळाला. जाड्या हरभर्‍याची 336 क्विंटल आवक झाली. यासाठी किमान 5300, कमाल 6410 आणि सरासरी 5800 रुपये दर मिळाला.

महिको बाजरीची 88 आणि हायब्रीडची 132 क्विंटल आवक झाली. बाजरीचे दर मात्र काहीसे कमी झाल्याचे चित्र आहे. बाजरीला किमान 2550 कमाल, 3200 आणि सरासरी 2900 रुपये दर मिळाला. तूरीची 79 क्विंटल आवक झाली. तूरीला सरासरी 6600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

काळ्या उडदाची 19 क्विंटल आवक झाली. यासाठी किमान 4000, कमाल 7400 आणि सरासरी 600 रुपये दर मिळाला. गरडा आणि जाडा हरभर्‍यांसह गूळ, बाजरी, हरभरा, उडीद, तूर, मूग, मका यांचीही आवक झाली. जळोची उपबाजारात कोथिंबीर, मेथी, गवार, भेंडी, गाजर, मिरची, फ्लावर, दोडका, टोमॅटो, भोपळा, पावटा, राजमा, पुदिना, मुळा, हिरवी मिरची, वाटाणा, शेंग आदी भाज्यांची विक्रमी आवक होत आहे. भाज्यांचे दर कमी अधिक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!