राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी घेतला ‘शिवभोजन’ चा आस्वाद
सहस्त्रचंद्र सोहळ्याच्या निमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमास लावली हजेरी
राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी घेतला ‘शिवभोजन’ चा आस्वाद
सहस्त्रचंद्र सोहळ्याच्या निमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमास लावली हजेरी
इंदापूर : प्रतिनिधी
युवा क्रांती प्रतिष्ठान व सृजन नागरी संघर्ष समिती यांच्या सौजन्याने शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने दि.१९ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत इंदापूर बस स्थानकातील शिवभोजन केंद्रावर १ हजार गरीब गरजूंना मोफत शिवभोजन थाळी हा उपक्रम राबविण्यात आला होता.सदरील उपक्रमाच्या समारोप सोहळ्याच्या निमित्ताने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी भेट देऊन राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल आयोजकांचे तोंडभरून कौतुक केलं त्याच बरोबर शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत वाढदिवसाचा होणारा अवाढव्य खर्च टाळून गोरगरिबांसाठी मोफत शिवभोजनचे आयोजन करण्याचा सल्ला दिला.
राज्यमंत्री म्हणून वावरत असताना ऐरवी पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवण करत असता मात्र आज शिवभोजन चा आस्वाद घेतला असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता भरणे म्हणाले की, शिवभोजन थाळीचा आस्वाद घेऊन बघा सर्व पदार्थ उत्तम आहेत.मी साधा माणूस आहे.साधा मंत्री आहे.तुम्ही मला इतकं तयार केलं आहे की बैलगाडीत बसा म्हंटल तरी बसेन.इंदापूर तालुक्यातील जनतेचा मला आर्शिवाद आहे.गोरगरिबांची शक्ती माझ्यासोबत असल्याने माझा उत्साह वाढतो व अधिक काम करण्यासाठी गती वाढते.
प्रसंगी राज्यमंत्री भरणेंनी युवा क्रांती प्रतिष्ठान व सृजन नागरिक संघाने राबवलेल्या या उपक्रमाचा गोरगरिबांना लाभ मिळाला असल्याचे म्हणत माजी नगरसेवक प्रशांत शिताप व आयोजकांचे आभारी मानले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,माजी नगरसेवक प्रशांत शिताप,पीयूष बोरा,धर्मचंद लोढा, हामा पाटील व इतर उपस्थित होते.