राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जनहित प्रतिष्ठान बारामती हब एक नंबर..
६६ खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जनहित प्रतिष्ठान बारामती हब एक नंबर…
६६ खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी
बारामती वार्तापत्र
दिनांक ७ मार्च ते ९ मार्च २०२५ या कालावधीमध्ये ज्ञान प्रबोधिनी निगडी या ठिकाणी ज्ञान प्रबोधिनी टाटा ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते.
यामध्ये बारामती विभाग, हराळी विभाग, चिपळूण विभाग व मावळ विभाग अशा चार केंद्रांच्या अंतर्गत या स्पर्धा झाल्या या स्पर्धांमध्ये वैयक्तिक खेळामध्ये ५० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, मेडिसिन बॉल थ्रो, टेनिस बॉल थ्रो तसेच सांघिक खेळामध्ये रिले रन, राऊंड रन, लंगडी, डॉजबॉल अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या
या स्पर्धेमध्ये जनहित प्रतिष्ठान बारामती हबच्या माध्यमातून जनहित प्रतिष्ठान (बारामती), पळसदेव (इंदापूर), डोर्लेवाडी (बारामती), वरवंड (दौंड), मुळीकवाडी (फलटण) अशा स्पोक मध्ये स्पर्धा करून या सर्व स्पोक मधून चांगल्या दर्जाच्या टीम निवडल्या होत्या या टीम मधील खेळाडूंनी अतिशय उत्तम खेळ करत खूप मोठा विजय खेचून आणला.
बारामती हब मधील या सर्व स्पोकच्या एकीच्या बळामुळे निगडी या ठिकाणी झालेल्या आंतरकेंद्रीय स्पर्धेमध्ये विजय मिळवला व सर्वोत्कृष्ट हब म्हणून पारितोषिक मिळवले.
या स्पर्धेत सर्व हब मधून जवळजवळ ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. बारामती हबमधुन ६६ खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. बारामती हबने ९ ट्रॉफी व शंभर पेक्षा जास्त मेडलची कमाई केली. यासाठी बारामती हबने निगडी केंद्रातून येणाऱ्या शेडूलनुसार खेळाचा सराव घेतला होता. याचेच हे फलित आहे.
बारामती हबच्या वतीने केंद्र समन्वयक व असिस्टंट कोच या दोन्ही पदांची जबाबदारी क्रीडा शिक्षक श्री.सचिन नाळे सरांनी उत्तम प्रकारे पार पाडली. यामध्ये निलेश भोंडवे,अजिंक्य साळी,सागर बनसुडे, महादेव टकले, करन बळीप, सुजित कालगावकर,शंभू भोपळे, प्रणव बनसुडे या स्पोक मार्गदर्शकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आमदार मा.सौ.उमा कापरे,टाटा ट्रस्ट क्रीडा विभागाच्या प्रमुख मा. नीलम बाबर देसाई मॅडम, निगडी केंद्रप्रमुख मा. मनोज देवळेकर सर, प्रोजेक्ट मॅनेजर मा.संकल्प थोरात सर, क्रीडा प्रमुख मा. भगवान सोनवणे सर, हेड कोच मा.आकाश टकले सर, क्रीडा शिक्षक मा.डुंबरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धांचे व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन ज्ञान प्रबोधिनी निगडी या ठिकाणी करण्यात आले.
एवढा मोठा विजय प्राप्त केल्यामुळे जनहित प्रतिष्ठान विद्यालयातील पालकांनी खेळाडू व प्रशिक्षक बारामतीत पोचल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत सर्व खेळाडूंचे स्वागत केले.
जनहित प्रतिष्ठान विद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, प्रोजेक्ट केंद्रप्रमुख मा.श्री. धनंजय क्षीरसागर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, आणि विद्यालायातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विजेत्या खेळाडूंचे, खेळाडूंच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन केले.