लाखेवाडीत कापड दुकानात चोरी
अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

लाखेवाडीत कापड दुकानात चोरी
अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
इंदापूर प्रतिनिधी –
लाखेवाडी (ता.इंदापूर) गावच्या हद्दीत असलेल्या कपड्याच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरट्याने नवीन कपडे वायफाय मशिन व रोख रकमेसह 1 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाणे येथे अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संदीप महादेव माने (वय 30, रा. लाखेवाडी, मानेमळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि.3) रात्री माऊली गारमेंट्स या कपड्याच्या दुकानाचा पत्रा उचकटून एक सीसीटीव्ही, डीव्हीआर, वायफाय मशिन व कपडे असा एकूण 1 लाख 37 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला.