वंजारवाडी च्या विकासासाठी कटिबद्ध: सुनेत्रा पवार
वंजारवाडी मध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

वंजारवाडी च्या विकासासाठी कटिबद्ध: सुनेत्रा पवार
वंजारवाडी मध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
बारामती वार्तापत्र
विविध विकासकामाच्या माध्यमातून जनतेला सर्व सेवा व सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून विकास कामाच्या माध्यमातून जनतेचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात असे प्रतिपादन खासदार सुनेत्रा पवार यांनी केले.
मंगळवार २२एप्रिल रोजी वंजारवाडी येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन प्रसंगी सुनेत्रा पवार बोलत होत्या या प्रसंगी सरपंच जगन्नाथ वनवे, उपसरपंच गोरख चौधर, सदस्य सागर दराडे, भारत चौधर, बाबासाहेब ठोकळे, व सदस्यां दिपाली नवनाथ चौधर, चिन्मयनंदा नितीन चौधर, शशिकला पोपट जगताप, राणी शरद चौधर,संगीता मारुती मालुसरे आणि प्रा शशिकांत चौधर,बचत गट प्रतिनिधी किशोरी जगताप,संजय चौधर, सोमनाथ गायकवाड, राहुल चौधर, सुभाष चौधर ,नागेश चौधर ,नवनाथ मालुसरे पिंटू सावंत ,जगन्नाथ खाडे, महादेव पाटील आदी उपस्तीत होते
वंजारवाडी च्या उर्वरित विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली.
भूमिगत गटार,रस्ता डांबरीकरण, काँक्रीटीकरण,पाणी पाईप लाईन व कलर काम बोलक्या भिंती तयार करणे आदी विकास कामे उत्कृष्ट झाली असून येणाऱ्या काळात औद्योगिक क्षेत्रालगत असलेली राज्यातील आत्याधुनिक सेवा सुवीधा असलेली पहिली आदर्श ग्रामपंचायत सर्वांच्या सहकार्याने करणार असल्याचा निर्धार सरपंच जगन्नाथ वणवे यांनी केला
शिरसुफळ ग्रामपंचायतला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सरपंच जुई हिवरकर व आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त जगन्नाथ वणवे यांचा खास सत्कार सुनेत्रा पवार यांनी केला.
कटफळ ते मालुसरेवाडी रस्ता १९७२ नंतर प्रथमच होत असताना अनेक तांत्रिक अडचणी दूर करून रस्त्या होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा व सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भगवान चौधर यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.