वालचंदनगर पोलीसांनी तक्रार निवारण दिनी 4 लाख 18 हजाराचा मुद्देमाल दिला फिर्यादिंच्या ताब्यात
पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

वालचंदनगर पोलीसांनी तक्रार निवारण दिनी 4 लाख 18 हजाराचा मुद्देमाल दिला फिर्यादिंच्या ताब्यात
पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
इंदापूर : प्रतिनिधी
वालचंदनगर पोलीस स्टेशन ला दर शनिवारी तक्रार निवारण दिन असतो सदर दिवशी पोलीस स्टेशन ला प्रभारी अधिकारी दिलीप पवार सहायक पोलीस निरीक्षक हे वरिष्ठ अर्ज, रयत अर्ज, अदखलपात्र अहवाल या मधील अर्जदार व गैरअर्जदार यांना समक्ष बोलावुन त्यांचे तक्रारीचे निवारण करीत असतात.
आज दि. 27/03/2021 रोजी तक्रार निवारण दिनाचे अनुषंघाने गुन्हा रजिस्टर क्रमाक 518/2021 मधील फिर्यादी यांना त्यांचा चोरीस गेलेला 3 लाख 37 हजार 80 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने त्यांचे ताब्यात देवुन वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गहाळ झालेले 81 हजार 500 रुपये किंमतीचे मोबाईल हे तक्रारदार सुयश चौधरी, बाळु सर्वगोड, अक्षय पवार, संभाजी बडे, प्रशांत खारतोडे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी ही मा. दिलीप पवार सहायक पोलीस निरीक्षक , पो.स.ई. अतुल खंदारे, पो हवा. तावरे, पो.हवा. ठोंबरे, पो.ना. अनसोडे, म.पो.कॉ. मोहिते यांचे पथकाने केली आहे.