विद्यार्थ्यांनी सर्वांच्या सहभागाने सामाजिक कार्य उंचवावे- डॉ. महादेव वाळुंज
मुंबई येथे राष्ट्रीय सेवा योजना आरडी परेडसाठी प्रियंका चव्हाण

विद्यार्थ्यांनी सर्वांच्या सहभागाने सामाजिक कार्य उंचवावे- डॉ. महादेव वाळुंज
मुंबई येथे राष्ट्रीय सेवा योजना आरडी परेडसाठी प्रियंका चव्हाण
इंदापूर प्रतिनिधी –
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर , कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भिगवन आणि श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने बिजवडी ता. इंदापूर येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे दि. 24 जानेवारी ते 30 जानेवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी वरील मत व्यक्त केले.
युथ फॉर डिजिटल भारत , युथ फॉर डिजिटल लिटरसी हा उद्देश घेऊन शिबिरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
26 जानेवारी रोजी मुंबई येथे राष्ट्रीय सेवा योजना आरडी परेडसाठी भिगवन महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका चव्हाण हिची निवड झाली होती तिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाळुंज म्हणाले की विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारचा अहंकार सोडून, सर्वांच्या सहभागाने आपले सामाजिक कार्य उंचवावे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की मन मे है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब या प्रमाणे आपण आपले सर्व सामाजिक कार्य पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत राहू .
बावडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे म्हणाले की,’ शिबिर कालावधीतील सकारात्मक गोष्टी घेऊन आपल्या जीवनात याचा उपयोग करावा.’
इंदापूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे म्हणाले की,’ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती करिता ही शिबिरे त्यांना मार्गदर्शक ठरतील.’
यावेळी शिबिर अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रा. नामदेव पवार प्रा. प्रकाश करे ,मयूर मखरे यांनी अहवालाचे लेखन केले.निकिता जाधव , इम्रान काझी , श्रीलेश विंचू या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कला शाखा विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर , विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिगवन महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिल बनसोडे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिर कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाविषयीची माहिती कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सुवर्णा जाधव यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंदापूर महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.पुरुषोत्तम साठे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार बावडा महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. तयाजी लोंढे यांनी आभार मानले.रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. उत्तम माने , प्रा. मनीषा गायकवाड , प्रा. धन्यकुमार माने , प्रा. सागर गुजराथी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला.