विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे जागतिक ग्राहक दिन साजरा
ग्राहकांचे मूलभूत हक्क कोणते

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे जागतिक ग्राहक दिन साजरा
ग्राहकांचे मूलभूत हक्क कोणते
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअ रिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन तहसील कार्यालय बारामती अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने १९ मार्च २०२५ रोजी जागतिक हक्क ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर प्रमुख पाहुणे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य या सर्वांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी सामूहिक रित्या महाराष्ट्र राज्य गीत म्हटले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राध्यापक यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी बारामती श्री. वैभव नावडकर, तहसीलदार बारामती श्री. गणेश शिंदे, तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षक तितीक्षा बारापात्रे, तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा प्रमुख ॲड. तुषार झेंडे, पुणे जिल्हा सहसंघटक दिलावर तांबोळी, बारामती तालुका अध्यक्ष श्री संजीव बोराटे, महिला अध्यक्ष बारामती तालुका मंजुश्री तावरे, तसेच बारामती तालुका कार्यकारणी सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, माजी विद्यार्थी अधिष्ठता डॉ. परशुराम चित्रगार आदींची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
उपविभागीय अधिकारी श्री. वैभव नावडकर यांनी महसूल विभागाकडून कोणकोणत्या सेवा या ग्राहकांना दिल्या जातात उदाहरणार्थ जसे की, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, यासारखे प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयाकडून दिले जातात अशावेळी आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे व दलालांच्या विळख्यात न पडता आपण आपली कागदपत्र योग्य वेळेत कशी मिळावीत व त्यासाठी देखील हा ग्राहक कायदा कसा उपयुक्त आहे याची माहिती त्यांनी दिली.
तसेच बारामतीचे तहसीलदार श्री गणेश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पुणे जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष ॲड तुषार झेंडे यांनी पूर्वीचा नागरिकांच्या हक्काचा कायदा हा कसा बदलत गेला त्यामध्ये कोणते मुलभूत बदल झाले याची माहिती दिली.
त्याचबरोबर त्यांनी ग्राहकांचे मूलभूत हक्क कोणते आहेत याची जाणीव करून दिली. तसेच ग्राहकाने कोणत्याही वस्तूची खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे तसेच बिएसआय केअर आणि जागृती ॲप याचीही माहिती दिली.
त्याचबरोबर समाजात घडणाऱ्या सायबर गुन्हेंविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी अधिकाधिक जागृत राहण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. संतोष करे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयांचे प्रा. हाफिज शेख, प्रा. पंकज आंबोले, प्रा. शशांक बिराजदार, प्रा. प्रदीप पाटील आदीनी विशेष कष्ट घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी नीरज सातपुते आणि ईशान शेवते यांनी केले.