शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअ रिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे “व्यक्तिमत्व विकास व सैन्य दलातील नोकरीच्या विविध संधी” या विषयावर मार्गदर्शन यशस्वी संपन्न

दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअ रिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे “व्यक्तिमत्व विकास व सैन्य दलातील नोकरीच्या विविध संधी” या विषयावर मार्गदर्शन यशस्वी संपन्न

दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

बारामती वार्तापत्र 

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअ रिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे ” ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग व प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

व्यक्तिमत्व विकास आणि सैन्य दलातील अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या नोकरीच्या विविध संधी या विषयावर प्रमुख मार्गदर्शक तथा वक्ते लेफ्टनंट कर्नल अभिषेक गोरेगावकर, सिक्स ट्रेनिंग रेजिमेंट, गोवा यांनी अत्यंत सखोल मार्गदर्शन करून या सेवेत काम करत असताना आलेले विविध अनुभव अत्यंत साध्या सोप्या व मोजक्या भाषेत व्यक्त केले.

प्रमुख पाहुण्यांनी विद्या प्रतिष्ठान संस्थेचे शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स ए आय याला भेट दिली व ए आयचा उपयोग सैन्य दला करता कसा करता येईल याविषयी देखील सखोल चर्चा व मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये प्रमुख वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन याची प्रेरणा घेऊन महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सैन्य दलातील वेगवेगळ्या पदावर आपली वर्णी लावावी अशी इच्छा व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, रजिस्टार डॉ. विनोद तोडकरी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. ज्योती कुलकर्णी, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. अनिल डिसले, तसेच शिक्षकेतर कर्मचारी चिन्मय गायकवाड, चारुदत्त दाते, सुनिल भोसले आदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. दीपक सोनवणे यांनी करून दिला, तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद तोडकरी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम हा अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

Back to top button