विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, संगणक विभाग, बारामती येथे “युटोपिया २०२५” हा टेक्निकल इव्हेंट उत्साहात साजरा
कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन लिंक देण्यात आली होती.

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, संगणक विभाग, बारामती येथे “युटोपिया २०२५” हा टेक्निकल इव्हेंट उत्साहात साजरा
कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन लिंक देण्यात आली होती.
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे महाविद्यालयातील संगणक विभाग विद्यार्थी शाखा संघटना यांच्या वतीने ०४ एप्रिल २०२५ व ०५ एप्रिल २०२५ या दोन दिवसात “युटोपिया २०२५” हा टेक्निकल इव्हेंट साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांचे शुभ हस्ते तसेच संगणक विभाग प्रमुख डॉ. ज्ञान कमल छाजेड आणि अन्य मान्यवर प्राध्यापकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन लिंक देण्यात आली होती.
या टेक्निकल इव्हेंट मध्ये २३८ विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या इव्हेंटमध्ये प्रामुख्याने “कोड अरेना”, “वेब रिप्लेका”, “हॅकाथॉन”, “फॉल गाईज” यासारख्या विविध स्पर्धां घेण्यात आल्या. या स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, आणि २०,००० रुपये इतके रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाचा मुख्य हेतू महाविद्यालयातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती जागृत व्हावी तसेच त्यांच्यातील सर्जनशीलतेला चालना मिळावी आणि त्यांच्या मधून उद्याचे भावी नवीन इंजिनियर आणि शास्त्रज्ञ तयार व्हावेत हा होता.
या टेक्निकल इव्हेंटच्या हेड म्हणून कावेरी शर्मा, पुरू भोईटे, रानिया सनादी, संगणक विद्यार्थी संघटना समन्वयक प्रा. मोनाली मोरे, विद्यार्थी सायली शिवजातक, सात्विक रोकडे, जानवी घोरपडे, जय गहिने आदींनी विशेष कष्ट घेतले व प्रमुख भूमिका बजावली. हा कार्यक्रम अत्यंत जल्लोषपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.