शेतकरी शेतमजूरांचा आधारवड हरपला, शेतकरी शेतमजूर पंचायतचे सर्वेसर्वा गुलाबराव तुपे अनंतात विलीन

शेतकरी शेतमजूरांचा आधारवड हरपला, शेतकरी शेतमजूर पंचायतचे सर्वेसर्वा गुलाबराव तुपे अनंतात विलीन
परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना सावरण्यासाठी ईश्वर बळ देवो हीच प्रार्थना.
बारामती : (प्रतिनिधी)
शेतकरी शेतमजूर पंचायतचे सर्वेसर्वा श्री गुलाबराव तुपे यांचे आज पहाटे 4 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 72 वर्षीचे होते. त्यांनी आणीबाणीच्या काळात अनेक कष्टकरी कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांनांवर लढा उभारत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांनी बरेच मोर्चे, आंदोलने, धरणे यामध्ये स्वतःहून पुढाकार घेतला व नेत्तृत्व केले होता. ते प्रामुख्याने असंघटित मजुरांच्या प्रश्नावर स्वतःहून पुढाकार घेत असत व असंघटित मजूर कामगार यांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत.
त्यांना त्यांच्या या कामगिरीबद्दल 1983 साली आंतरराष्ट्रीय श्रमिक संघाच्या वतीने प्रमाणपत्राने गौरवान्वित करून प्रमाणित करण्यात आले होते. त्यांनी पुणे, सातारा, सोलापूर व अहमदनगर या जिल्ह्यातील असंघटित मजुरांच्या प्रश्नांवर लढा उभारून कामगार वर्गाला न्याय देण्याचे काम केले आवहे. त्यांनी पूर्ण वेळ असंघटित क्षेत्रातील मजुरांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे शेवटपर्यंत काम केले त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मले, दोन सुना असा परिवार आहे.
त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे पुत्र भारत तुपे यांनी ही असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठवलं उचलली आहेत. त्यांच्या वर व त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना सावरण्यासाठी ईश्वर बळ देवो हीच प्रार्थना.