संजय गांधी निराधार योजनेची १५२ प्रकरणे मंजूर
बैठकीत एकूण १६८ अर्जाची छाननी करण्यात आली.
बारामती वार्तापत्र
संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी १६ जून रोजी प्रशासकीय भवन बारामती येथे झालेल्या बैठकीत १५२ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार महादेव भोसले, समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, शिवराज माने, शहाजी दळवी, निलेश मदने, प्रविण गालिंदे, लालासो होळकर, अशोक इंगुले, जिवना मोरे, नुसरत इमामदार आदी उपस्थित होते.
बैठकीत एकूण १६८ अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेच्या ११६ प्राप्त अर्जापैकी १०९ मंजूर तर ७ अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे ४६ प्राप्त अर्जापैकी ३७ अर्ज मंजूर तर ९ अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे प्राप्त ६ अर्ज मंजूर करण्यात आले.