स्थानिक

अजित ‘दादांनी लावलेल्या झाडांची काळजी घेऊ’; बारामतीत वृक्षांना राखी बांधून भावनिक अभिवादन

भाऊ-बहिणीच्या नात्यासोबत निसर्गाशीही बंध

अजित ‘दादांनी लावलेल्या झाडांची काळजी घेऊ’; बारामतीत वृक्षांना राखी बांधून भावनिक अभिवादन

भाऊ-बहिणीच्या नात्यासोबत निसर्गाशीही बंध.

बारामती वार्तापत्र 

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण बारामतीत यंदा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कॅनॉल रोड परिसरातील जवाहर पार्क येथे महिलांनी अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांनी लावलेल्या झाडांना राखी बांधली.
महिलांनी प्रथम अजित पवार यांच्या छायाचित्राचे औक्षण केले. त्यानंतर झाडांना राखी बांधून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते.त्यांच्या स्मृतींना उजाळा देत महिलांनी हा उपक्रम राबविला.

यावेळी महिलांनी अजित पवार यांच्या पर्यावरणविषयक आवडीचा उल्लेख करत, “दादांनी लावलेल्या झाडांची काळजी घेणे हीच त्यांच्या आठवणींना खरी मानवंदना आहे,” अशी भावना व्यक्त केली.

महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचाही उल्लेख करत रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहिणीच्या नात्यासोबतच माणूस आणि निसर्गातील नाते अधिक घट्ट करण्याचा संदेश दिला.

झाडांना राखी बांधत महिलांनी वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. भावनिक आठवणी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवणाऱ्या या अनोख्या रक्षाबंधनाची बारामतीमध्ये चर्चा होत आहे.

Back to top button