क्राईम रिपोर्ट

“अवैध कत्तल उधळली – बारामती पोलिसांची कारवाई, १७ जनावरे गोशाळेत सुरक्षित”

अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल.

“अवैध कत्तल उधळली – बारामती पोलिसांची कारवाई, १७ जनावरे गोशाळेत सुरक्षित”

अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल.

बारामती वार्तापत्र

गोवंश कत्तल व अवैध वाहतूक प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी दिनांक 19/04/2026 रोजी मध्यरात्री गोकुळनगर, मळद (मळद–फलटण रोड) येथे अत्यंत धाडसी व नियोजनबद्ध छापा कारवाई करून १० गायी व ७ बैल असे एकूण १७ गोवंश जनावरे जप्त करून सुरक्षिततेसाठी गोशाळेत जमा केली आहेत.

पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचताच कत्तल करणाऱ्यांचा मनोदय फसला असून आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. सदर प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 150/2026 नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र गोवंश वध निबंधन व गोवंश संवर्धन अधिनियम, २०१५ चे कलम ५, ९, ११ तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, १९६० चे कलम ११(१)(a), ११(१)(c), ११(१)(e), ११(१)(h), ११(१)(m) व ३८ अन्वये कायदेशीर कारवाई सुरू आहे.

माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार व पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. श्री सुदर्शन राठोड यांच्या झिरो टॉलरन्स धोरणाच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून गोवंश कत्तल व प्राण्यांवरील क्रूरतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश देण्यात आला आहे.

प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पो.उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, सहाय्यक पो.उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस हवालदार संजय जाधव, पोलीस हवालदार यशवंत पवार, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, गिरीश नेवसे, अमोल देवकाते, ऋषिकेश जाधव व सुरज घाटे या पथकाने रात्रीच्या वेळी छापा टाकून प्रभावी कारवाई केली.

या प्रकरणातील आरोपींची नावे निष्पन्न करण्याचे काम सुरू असून त्यांचा सखोल शोध घेतला जात आहे. संबंधित आरोपींचा पूर्व गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्यात येत असून, रेकॉर्ड आढळल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेली सर्व जनावरे दयोदय गोशाळा, मळद येथे सुरक्षिततेच्या कारणास्तव जमा करण्यात आली असून त्यांना आवश्यक आहार, पाणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गोवंश हत्या, अवैध वाहतूक किंवा प्राण्यांवरील कोणतीही क्रूरता सहन केली जाणार नाही. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल.

नागरिकांनी अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन किंवा प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. (श्रीशैल चिवडशेट्टी) प्रभारी पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन, जि. पुणे ग्रामीण

Check Also
Close
Back to top button