राजकीय
बारामतीत धनगर समाजाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा; मोठ्या प्रमाणात मतदानाचा निर्धार बारामती, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती तालुक्यातील धनगर बांधव, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेत संवाद साधला. या मेळाव्यात धनगर समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत येणाऱ्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार मैदानात आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी उपस्थित धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने मतदान करून सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. अहिल्या विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त

धनगर समाजाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा; मोठ्या प्रमाणात मतदानाचा निर्धार
सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कालबारामती तालुक्यातील धनगर बांधव, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेत संवाद साधला. या मेळाव्यात धनगर समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत येणाऱ्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार मैदानात आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
यावेळी उपस्थित धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने मतदान करून सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. अहिल्या विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.






