आरोग्य शिबिराने बसवेश्वर जयंती बारामती साजरी ; १०० नागरिकांनी घेतला लाभ
नेत्र तपासणीदरम्यान ३ मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया होणार

आरोग्य शिबिराने बसवेश्वर जयंती बारामती साजरी ; १०० नागरिकांनी घेतला लाभ
नेत्र तपासणीदरम्यान ३ मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया होणार.
बारामती वार्तापत्र
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत समाजाच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात विविध रुग्णालयांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात आली.
मुक्ताई हॉस्पिटलच्या डॉ. मीनल गवसणे यांनी त्वचारोग तपासणी केली. बारामती हॉस्पिटलच्या वतीने बीपी, शुगर, ऑक्सिजन व ईसीजी तपासणी करण्यात आली. एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्याची सुविधा तसेच अल्प दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
शिवम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वेळापूर यांच्या वतीने हार्निया, अपेंडिक्स व मुतखडा यासंदर्भात तपासणी करण्यात आली. या शिबिराचा सुमारे १०० समाज बांधवांनी लाभ घेतला. नेत्र तपासणीदरम्यान ३ मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत.
याशिवाय डॉ. मीनल गवसणे यांनी १० मे ते २० मे दरम्यान समाज बांधवांसाठी मोफत सल्ला देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी बारामती शहर पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, नगरसेवक यशपाल पोटे, नगरसेविका अनुप्रीता ताबे (डांगे), माजी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले उपस्थित होते. यावेळी समाजाचे अध्यक्ष समीर ढोले, माधुरी झाडबुके, हेमा बोधे व विश्वस्त मंडळ तसेच रोहित पिल्ले, अभिषेक ढोले, विजय गाढवे, सचिन शाहीर, अॅड. अमित ढोले, तनिष्क ढोले यांच्यासह बसवप्रेमी उपस्थित होते.






