राजकीय

बारामतीत सायकल रॅलीतून मतदान जनजागृती

“मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो ”

बारामतीत सायकल रॅलीतून मतदान जनजागृती

“मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो ”

बारामती वार्तापत्र 

बारामती विधानसभा मतदारसंघात मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी बारामती तालुक्यात सायकल क्लबच्या माध्यमातून विशेष प्रचार-प्रसिद्धी अभियान राबविण्यात आले.

ही जनजागृती मोहीम निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे तसेच सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

यावेळी तालुका प्रचार-प्रसिद्धी प्रमुख सविता खारतोडे यांच्यासह बारामती सायकल क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मतदान प्रतिज्ञेने करण्यात आली. त्यानंतर तीन हत्ती चौकातून सायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी“मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो ” अशा घोषणा देण्यात आल्या. सायकल रॅलीद्वारे नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत आगामी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच, सर्व सायकल क्लब सदस्यांनी मतदान करण्याचा निर्धार व्यक्त करत इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करण्याचे आवाहन यावेळी केले.

Back to top button