टी.सी महाविद्यालय एनसीसीला 19 सुवर्ण 2 रौप्य

200 मीटर धावणे स्पर्धेत श्वेता रणवरे हिनेही सुवर्णपदकाला गवसणी घातली

टी.सी महाविद्यालय एनसीसीला 19 सुवर्ण 2 रौप्य

200 मीटर धावणे स्पर्धेत श्वेता रणवरे हिनेही सुवर्णपदकाला गवसणी घातली

बारामती वार्तापत्र

पुणे ग्रुप हेड कॉर्टर, पुणे येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या(एन.सी.सी) संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबीर -714 मध्ये 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान विविध स्पर्धा पार पडल्या.यामध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास 19 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके प्राप्त झाली. यात महाविद्यालयाच्या 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

दहा महाविद्यालयांच्या एनसीसी विभागात झालेल्या स्पर्धेत चुरशीचे सामने झाले.यामध्ये हॉलीबॉल स्पर्धेत हर्षल शिंदे, तेजस ढोबळे, चैतन्य खांडेकर, श्रीराम चव्हाण,प्रतीक पवार,सुशांत तावरे यांनी सुवर्ण पदक पटकाविले. टग ऑफ वॉर मध्ये श्वेता रणवरे,श्रावणी बाचल, दिव्या देवकाते,फरजाना पठाण, ऐश्वर्या झाडबुके यांना सुवर्ण, 100 मीटर धावणे स्पर्धेत ओंकार गवळी याला सुवर्ण तर वैभव भांड याला रौप्य पदक प्राप्त झाले.

200 मीटर धावणे स्पर्धेत श्वेता रणवरे हिनेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. रायफल शूटिंग- सिद्धी जाधव रौप्य, सर्वोत्कृष्ट छात्र- साहिल चव्हाण, फायरिंग सिलेक्शन- ओंकार माळी, सिद्धी जाधव, इन्स्ट्रमेंट स्पेशल टॅलेंट- श्रावणी बाचल, मिमिक्री- ओमकार चव्हाण, सर्वोत्कृष्ट गायक- गोरख चंदनशिवे,बॅरॅक सीनियर- देवाशिष पाटील, प्रामाणिक कॅडेट-गोरख चंदनशिवे,सोलो डान्स -श्वेता रणवरे, सेल्फ डिफेन्स- फरजाना पठाण, बेस्ट अँकरिंग- अमिषा कुंभार या सर्वांनी सुवर्णपदक पटकाविले. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे एनसीसी लेफ्टनंट प्रा विवेक बळे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शहा वाघोलीकर, सचिव मिलिंद शहा वाघोलीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.चंद्रशेखर मुरूमकर तसेच सर्व उपप्राचार्य,रजिस्ट्रार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

Related Articles

Back to top button