पुण्यात हर्षवर्धन पाटील यांनी घेतली लोणकर कुटुंबीयांची भेट; सव्वा लाख रुपयांची केली मदत

शासकीय अनास्था कारणीभूत असल्याचे केले मत व्यक्त

पुण्यात हर्षवर्धन पाटील यांनी घेतली लोणकर कुटुंबीयांची भेट; सव्वा लाख रुपयांची केली मदत

शासकीय अनास्था कारणीभूत असल्याचे केले मत व्यक्त

इंदापूर:प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी फुरसुंगी-पुणे येथे स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सोमवारी सांत्वन केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी लोणकर कुटुंबियांना पाटील कुटुंबियांच्या वतीने रू. १.२५ लाखाची रोख मदत दिली.

स्वप्निल लोणकर हे अतिशय हुशार व बुद्धिमान युवक होते. अहोरात्र अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश संपादन केले होते. मात्र त्यांना शासनाकडून नोकरीचे नियुक्ती पत्र दिले जात नव्हते. घरची परिस्थिती हलाखीची होती, आर्थिक अडचणी वाढत होत्या. त्यामुळे शासनाकडून नोकरीच्या नियुक्तीसाठी होणाऱ्या विलंबास कंटाळून निराश झालेल्या स्वप्निल लोणकर यांनी आपले जीवन संपविले. शासकीय अनास्था यास कारणीभूत आहे. राज्य शासनाकडून युवकांच्या प्रश्नांकडे, त्यांना रोजगार मिळवून देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

राज्यात सध्या सुमारे ५ ते ६ लाख युवक एमपीएससीचा अभ्यास करीत आहेत. राज्य शासन मात्र शासकीय सेवेतील जागा भरण्यास चालढकल करीत आहे. कधीतरी केवळ ६०० ते ७०० जागा भरून बेरोजगारी संपणार नाही, रोजगाराअभावी युवकांमध्ये नैराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शासकीय सेवेतील रिक्त असलेल्या सुमारे १.५ ते २ लाख जागा भरण्यासाठी प्रक्रिया शासनाने तात्काळ चालु करावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली .

Related Articles

Back to top button