आपला जिल्हा

कर्मयोगी सहयोग ओंकार शुगरकडून यंदा ऊस उत्पादकांना उच्चांकी दर देण्याचे नियोजन!

बाबुराव बोत्रे-पाटील यांची माहिती; शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला देण्याचा कारखाना प्रशासनाचा निर्धार

कर्मयोगी सहयोग ओंकार शुगरकडून यंदा ऊस उत्पादकांना उच्चांकी दर देण्याचे नियोजन!

बाबुराव बोत्रे-पाटील यांची माहिती; शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला देण्याचा कारखाना प्रशासनाचा निर्धार**

इंदापूर,  –

यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत उच्चांकी दर देण्याचे नियोजन कर्मयोगी सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगरने केले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, या उद्देशाने कारखाना प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती बाबुराव बोत्रे-पाटील यांनी दिली.

पत्रकारांशी संवाद साधताना बोत्रे-पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांचा घाम, कष्ट आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विविध अडचणींवर मात करत कारखान्याचे सक्षम व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना उच्चांकी दर देण्याचे आमचे नियोजन आहे.”

ते पुढे म्हणाले की, कर्मयोगी सहयोग ओंकार शुगरने नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. उसाचे वजन पारदर्शक पद्धतीने करणे, वेळेत बिलिंग करणे तसेच शासनाच्या नियमानुसार एफआरपीची रक्कम वेळेत अदा करणे, याबाबत कारखाना प्रशासन कटिबद्ध आहे. यंदाच्या हंगामातही शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येऊ न देता त्यांना योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

**शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देण्याचे आवाहन**

यंदाच्या हंगामात उच्चांकी दर देण्याच्या नियोजनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला ऊस कर्मयोगी सहयोग ओंकार शुगरला देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही बाबुराव बोत्रे-पाटील यांनी केले. कारखान्याच्या या घोषणेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता प्रत्यक्ष जाहीर होणाऱ्या ऊसदराकडे लागले आहे.

Back to top button