इंदापूर

“भारत बंद”ला इंदापूरात शंभर टक्के प्रतिसाद

व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवत दर्शविला पाठिंबा

“भारत बंद”ला इंदापूरात शंभर टक्के प्रतिसाद

व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवत दर्शविला पाठिंबा

इंदापूर-प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या नव्या कृषी विषयक धोरणाविरोधात दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला इंदापूर शहरात सर्व व्यापारी वर्गाने पाठिंबा दर्शवित कडकडीत बंद पाळला.

आज सकाळपासून शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद होते. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ,हॉटेल्स ,भाजीविक्रेते स्टॉल,मासळी बाजार व इतर सर्व प्रकारची दुकाने बंद होती.

या बंद दरम्यान एसटी बससेवा तुरळक प्रमाणात सुरू होती.त्यामुळे काही प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाल्याचे चित्र दिसून आले.

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, बहुजन मुक्ती पार्टी,भारतीय युवा मोर्चा,समता सैनिक दल अशा राजकिय व सामाजिक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला होता.

Related Articles

Back to top button