स्थानिक

गणपती मंडळांसाठी ‘सिंगल विंडो’; बारामतीत उत्सवासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

सुरक्षेसाठी CCTV, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

गणपती मंडळांसाठी ‘सिंगल विंडो’; बारामतीत उत्सवासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

सुरक्षेसाठी CCTV, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

बारामती वार्तापत्र 

गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामतीसह परिसरात जय्यत तयारी सुरू केली आहे. गणेश मंडळांच्या बैठका घेऊन कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात येत आहेत.

गणेशोत्सवात डीजे व ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा ओलांडली जाऊ नये, यासाठी पोलिसांनी गणेश मंडळांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या डेसिबल मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी केले आहे.

विशेषतः नवजात बालके, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या आवाजाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे नॉईज पॉल्युशन टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

🔐 सुरक्षेसाठी CCTV, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

गणेश मंडळांनी मंडप व परिसरातील सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवावेत, तसेच महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सायबर फसवणूक आणि अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, बारामती शहरातील गणेश मंडळांना विविध परवानग्या मिळवण्यासाठी सिंगल विंडो सिस्टमची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मंडळांच्या परवानगी प्रक्रियेला अधिक सुलभता येणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात गर्दीची ठिकाणे, मिरवणूक मार्ग आणि संवेदनशील भागांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

Back to top button