इंदापूर

इंदापूर तालुक्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून १०० कि.मी. पाणंद रस्ते होणार

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती

इंदापूर तालुक्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून १०० कि.मी. पाणंद रस्ते होणार

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील ७२ ठिकाणच्या रस्त्यांना मंजुरी घेतली असून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून जवळपास १०० किलोमीटर अंतराचे रस्ते करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

भरणे म्हणाले की,या कामासाठी प्रत्येक किलोमीटर करिता साधारणपणे २५ लाख इतका कमी अधिक प्रमाणात अंदाजपत्रकीय खर्च असतो.याप्रमाणे तालुक्यातील पाणंद रस्याकरिता जवळपास २५ कोटी रुपये निधी खर्चीला जाईल.रस्ते पूर्ण झाल्यास दळणवळण सोयीचे होईलच परंतु शेतकऱ्याच्या बांधापर्यंत वाहने गेल्यास शेतमाल वेळेवर बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होईल.

या योजनेतून तालुक्यातील अंथूर्णे, अजोती, कचरवाडी, कडबनवाडी, काझड, कळंब, कळस, कालठण नं.२, कुरवली, गौतंडी, गिरवी, चाकाटी, निमगाव केतकी, जाधववाडी, जाचकवस्ती, झगडेवाडी, लोणी देवकर, वडापुरी, वरकुटे खुर्द, शहा, शेळगाव, सणसर, सपकळवाडी, सरडेवाडी, सराफवाडी, हगारेवाडी, पिंपरी बुद्रुक, पिटकेश्वर, पिठेवाडी,पोंधवडी,बाभूळगाव,बिजवडी, मदनवाडी, माळवाडी, लाकडी, लासुर्णे, लुमेवाडी, तक्रारवाडी, तरटगाव, निमसाखर, पिंपरी खुर्द, निरगुडे, निरनिमगाव, न्हावी, पंधारवाडी व पळसदेव येथे रस्ते होणार आहेत.

Related Articles

Back to top button