तुमच्या चिमुकल्यांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या! पावसात खेळायला गेला आणि विजेचा धक्का लागला 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
गेल्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.
तुमच्या चिमुकल्यांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या! पावसात खेळायला गेला आणि विजेचा धक्का लागला 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
गेल्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.
प्रतिनिधी
चिमुकल्यांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर त्याच्यावर संकट ओढवलं तर धोक्याचं ठरू शकतं. रायगडच्या तळा तालुक्यात अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडली आहे. शेणवली इथं जिवंत विजवाहक तारेचा स्पर्श होऊन 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
गेल्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये तात्पुरता वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. शेणवली इथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात विजवाहक तार तुटून पडली होती. ही तार शेतात तुटून पडल्याची माहिती मिळाली आहे.
शेतात खेळण्याच्या नादात 10 वर्षांच्या चिमुकल्याचा या तारेला स्पर्श झाला. वीजवाहक तारेचा धक्का लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. खेळायला गेलेल्या ऋतिक चा या तारेला स्पर्श झाला आणि ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे हिलम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.