क्राईम रिपोर्ट

बारामती शहरातील घरफोडी टोळी पकडून दागिने हस्तगत करणारे शहर पोलिस टीम चा पोलीस अधीक्षक यांचेकडून सत्कार

आरोपीकडून एकूण सात लाख 20 हजार 300 रुपये किमतीचा व 177 ग्रॅम 17 तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त.

बारामती शहरातील घरफोडी टोळी पकडून दागिने हस्तगत करणारे शहर पोलिस टीम चा पोलीस अधीक्षक यांचेकडून सत्कार

आरोपीकडून एकूण सात लाख 20 हजार 300 रुपये किमतीचा व 177 ग्रॅम 17 तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त.

क्राईम; बारामती वार्तापत्र

बारामती शहरांत घरफोडीचे प्रमाण वाढल्याने,या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते.पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलीस ठाणे गुन्हे उघड करणेबाबत आदेश दिले होते.त्याप्रमाणे शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,सहा. पोलीस निरीक्षक उमेश दंडीले,सहा.पोलीस निरीक्षक
प्रकाश वाघमारे यांना सांगितले असता त्यांनी एक तपास पथक तयार करून या प्रकारचे गुन्ह्याचे पद्धतीचा अभ्यास करून शेजारील जिल्ह्यातील आरोपी ची माहिती घेतली असता आरोपी नामे लोकेश रावसाहेब सुतार वय 28 वर्षे राहणार लिंगनूर तालुका मिरज जिल्हा सांगली हा कळंबा कोल्हापूर येथील जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असून त्याची पद्धत याच प्रकारे गुन्हे करण्याची असल्याने व तो अटल घरफोडी रेकॉर्डवरील आरोपी असल्याने त्याच बारामती शहर पोलीस स्टेशन ने ताबा वारंट ने आणून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण रीतीने समांतर चौकशी तपास केला असता सदर आरोपीने बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्व दिवसा घरफोडी त्याचा साथीदार संदीप यशवंत पाटील राहणार लिंगनूर तालुका मिरज जिल्हा सांगली याच्यासह निष्पन्न झाले आहे त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे .

सदर आरोपी यांचेकडून खालील गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे गुन्हा रजिस्टर नंबर १४७/२०२१ भादवि कलम ४५४,३८० या गुन्ह्यातील.

१) ९०,०००रु किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण
२) २५,००० रू किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दोन अंगठ्या

३) 12,500 रू किमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे खड्याचे कानातले
गु.र.नं ४५०/२०२१ भादवि 454 380
१)१,१0,000 रू किमतीचा पावणेतीन तोळे वजनाचा सोन्याचा राणी हार
२) १,५०,००० रू किमतीचा ३७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे साखळीचे गंठण
३) १,४०,००० रू किमतीचा 35 ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणी हार
गु.र.नं ७५२/२०२१ भा द वि ४५४,३८०
१) ५६,००० रू किमतीचे 14 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस
२) ३४,२०० रू किमतीचे नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील फुले
३) १,०, २६०० रू किमतीचे 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण
याप्रमाणे सदर आरोपीकडून एकूण सात लाख 20 हजार 300 रुपये किमतीचा व 177 ग्रॅम 17 तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

बारामती शहर पोलीस ठाणे महिलांचे बचत करून खरेदी केलेले श्रीधन दागिने जप्त केल्याने यातील फिर्यादी यांचे चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे तसेच यापुढे सर्व बारामतीकरांना विनंती आहे की आपले घर व दरवाजाला मजबूत कुलूप लावा लोखंडी ग्रील बसून घ्या तसेच आपले घराजवळ अगर सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसून घ्या शक्यतो दागिने लॉकरमध्ये मध्ये ठेवा कारण किमती वस्तू ची सुरक्षितता पाहणे हे धारकांचे प्रथम कर्तव्य आहे नाही तर मनस्ताप वाट्याला येतो पोलीस तर त्याचे काम कौशल्याने करून तपास करणार आहे तरी सदर बाबत सर्व बारामतीकरांनी खबरदारी घेणे बाबत पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी आवाहन केले आहे.

या गुण्याचे शोध लागल्याने बारामती शहरात गेले 4 महिन्यापासून घरफोडी झालेली नाही . या बाबत आज 15.4.22 रोजी पोलीस अधीक्षक पुणे यांनी बेस्ट recovery of month फेबरुवारी ha reward milala व पोलीस पथकाचा त्यांनी आज क्राईम मीटिंग मध्ये सत्कार केला पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडेले, सुनील कोठे, कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर ,तुषार चव्हाण

Related Articles

Back to top button