आपला जिल्हा

पार्थ पवार–कायनात दारा यांच्या विवाहाची तारीख निश्चित; २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामतीत रंगणार विवाहसोहळा

कुटुंबातील आई किंवा वडिलांच्या निधनानंतर एका वर्षाच्या आतच विवाह करावा लागतो

पार्थ पवार–कायनात दारा यांच्या विवाहाची तारीख निश्चित; २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामतीत रंगणार विवाहसोहळा

कुटुंबातील आई किंवा वडिलांच्या निधनानंतर एका वर्षाच्या आतच विवाह करावा लागतो

बारामती वार्तापत्र 

खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या विवाहाची तारीख निश्चित झाली असून, २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी २९ जुलै २०२६ रोजी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईक व निमंत्रितांच्या उपस्थितीत साखरपुडा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी दिली.

खासदार पार्थ पवार यांच्या विवाहासंदर्भात व्यक्त होत असलेल्या धार्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी उमेश पाटील यांनी करवीर पीठाच्या पूज्य शंकराचार्यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. कुटुंबातील आई किंवा वडिलांच्या निधनानंतर एका वर्षाच्या आतच विवाह करावा लागतो, अन्यथा पुढील तीन वर्षे लग्नकार्य करता येत नाही, असा समाजात प्रचलित असलेला समज यावेळी चर्चेचा विषय ठरला.

याबाबत शंकराचार्यांनी धर्मशास्त्रानुसार आई-वडिलांच्या निधनानंतर आवश्यक ते सर्व विधी आणि संस्कार योग्य प्रकारे पार पाडणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मात्र, एका वर्षाच्या आतच विवाह करणे बंधनकारक असल्याचा कोणताही धार्मिक नियम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती उमेश पाटील यांनी दिली.

दरम्यान, पार्थ पवार यांच्या होणाऱ्या वधू कायनात दारा या मूळच्या चंदीगड येथील असून सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही माध्यमांमध्ये त्यांच्या नावाबाबत व जन्मस्थळाबाबत चुकीची माहिती प्रसारित होत असल्याने वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी ही अधिकृत माहिती देण्यात आली असल्याचेही उमेश पाटील यांनी सांगितले.

पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या विवाहाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर बारामतीसह राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D