क्राईम रिपोर्ट

गुंडगिरीचा शेवट गुंडगिरी तूनच ! संतोष जगतापच्या गोळीबार प्रकरणी इंदापूरातून दोन आरोपी अटक

इतर फरार आरोपींचा पुणे पोलिस शोध घेत आहेत.

गुंडगिरीचा शेवट गुंडगिरी तूनच ! संतोष जगतापच्या गोळीबार प्रकरणी इंदापूरातून दोन आरोपी अटक

इतर फरार आरोपींचा पुणे पोलिस शोध घेत आहेत.

क्राईम ; बारामती वार्तापत्र

वाळू व्यावसायिक संतोष जगताप (वय 38, रा. राहू) याचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून करणा-या दोघांना पुणे पोलिसांनी अवघ्या 30 तासाच्या आत इंदापूरातून अटक केली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. याबाबत शहर पोलीसांनी दुजोरा दिला आहे.

पवन मिसाळ, नन्या आदलिंग असे ताब्यात घेतलेल्यांची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलीस सूत्रांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 22) दुपारी हॉटेल सोनाई समोर संतोष जगतापवर गोळीबार झाला होता. यात संतोष आणि त्याचा अंगरक्षक गंभीर जखमी झाले.

दरम्यान, संतोषचा मृत्यू झाला.संतोष जगतापने देखील गोळीबार केले होते. यात स्वप्नील खैरेचा मृत्यू झाला. संतोष जगतापवर भरदिवसा गोळीबार करणाऱ्याचा शोध पुणे पोलिस घेत होते.

दरम्यान, आरोपींबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदापूर जवळून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अग्नीशस्त्रे आणि वाहन जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

इतर फरार आरोपींचा पुणे पोलिस शोध घेत आहेत.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D