मोक्का मध्ये फरार आरोपीस बारामती शहर गुन्हे शोध पथकाने ठोकल्या बेडया
गुप्त बातमीदारामार्फत
मोक्का मध्ये फरार आरोपीस बारामती शहर गुन्हे शोध पथकाने ठोकल्या बेडया
गुप्त बातमीदारामार्फत
क्राईम;बारामती वार्तापत्र
मोक्का गुन्ह्यातील दीड वर्षा पासुन फरार असलेल्या आरोपीस अखेर बारामती शहर गुन्हे शोध पथकाने बेडया ठोकल्या आहेत. नितीन बाळासाहेब तांबे (वय २४ वर्षे) (रा.पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं१२०/२०२१ भा.द.
वी.क ३९५,३८६ सह महाराष्ट संघटीत गुन्हेगारी नियंत्रय अधिनीयम कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल
गुन्हयातील फारार आरोपी नितीन बाळासाहेब तांबे (वय २४ वर्षे) (रा.पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे) हा गेले दीड वर्षा पासुन फरार होता. आरोपीला बारामती शहर गुन्हे शोध पथक तपास करत होते . मात्र तो अदयाप पर्यत मिळून येत नव्हता
नितीन तांबे हा रामटेकडी पुणे येथे आला असल्याची (दि :४) रोजी गुप्त बातमीदारामार्फत गुन्हे शोध पथकास माहिती मिळाली. पथकाने लगेचच सदर ठिकाणी रवाना होऊन रामटकडी पुणे येथे सापळा रचुन सदर आरोपीस ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.
मोक्यातील फरार आरेपीस जेरबद केले अरोपी नितीन बाळासो तांबे याचे वर बारामती शहर पोलिस स्टेशन मध्ये भा.द.वी क ३९४,३४ अशा प्रकारचे एकूण ११ गंभिर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी नितीन तांबे यांच्यावर यापुर्वी देखिल मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.दुसरा मोक्का लागल्यापासुन सदर आरोपी हा फारार होता. पुणे ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत होते अखेर बारामती शहर गुन्हे शोध पथकास त्याचा ठाव ठिकाणा लागल्याने त्यास तात्काळ ताब्यात घेऊन बेडया ठोकल्या.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मिलीद मोहिते ,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, पोलीस हवालदार कांबळे, पोलीस नाईक कोळेकर,खांडेकर पोलीस कॉन्स्टेबल तुषार चव्हाण,कोठे,इंगोले यांनी केली.