क्राईम रिपोर्ट

बारामतीत पुन्हा मंगळसूत्र हिसकावले; मारवाड पेठ–तांदुळवाडी वेस मार्गावर खळबळ; घटनेचा CCTV व्हिडिओ व्हायरल.

दोन दिवसांत दुसरी घटना

बारामतीत पुन्हा मंगळसूत्र हिसकावले; मारवाड पेठ–तांदुळवाडी वेस मार्गावर खळबळ; घटनेचा CCTV व्हिडिओ व्हायरल.

दोन दिवसांत दुसरी घटना

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मारवाड पेठ ते तांदुळवाडी वेस चौक या मार्गावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने हिसकावून नेल्याची घटना २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नित्ता अविनाश गावडे, रा. कृषी देवता, टी.सी. कॉलेज शेजारी, बारामती या मारवाड पेठ येथून तांदुळवाडी वेस चौकाच्या दिशेने जात होत्या.

त्यावेळी अज्ञात व्यक्तीने अचानक त्यांच्या जवळ येत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि घटनास्थळावरून पसार झाला.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संबंधित महिला घाबरून गेल्या. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी शहरातील वर्दळीच्या मार्गावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

दोन दिवसांत दुसरी घटना!

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच गरुड बाग रोड परिसरातही एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडल्याची बोलले जात आहे.  त्यामुळे अल्पावधीत अशा घटना घडत असल्याने शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

CCTV फुटेजच्या आधारे तपासाची गरज
मारवाड पेठ ते तांदुळवाडी वेस चौक तसेच परिसरातील इतर CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणे पोलिसांच्या तपासात महत्त्वाचे ठरणार आहे.

संशयित व्यक्ती कोणत्या दिशेने पसार झाला, त्याने दुचाकीचा वापर केला होता का आणि घटनेपूर्वी त्याने महिलेचा पाठलाग केला होता का, याचा तपास होण्याची शक्यता आहे.

घटनेच्या वेळी परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांना संशयित व्यक्ती किंवा त्याच्या वाहनाबाबत काही माहिती असल्यास ती पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, रात्रीच्या वेळी प्रवास करताना महिलांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे. �⁠या प्रकरणाचा CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, �⁠संशयिताचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Back to top button