क्राईम रिपोर्ट

बारामतीत बनावट ‘गोल्ड फ्लेक’चा पर्दाफाश

अकरा लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त; मुंबई मार्गे बारामती सिगारेटचा साठा

बारामतीत बनावट ‘गोल्ड फ्लेक’चा पर्दाफाश

अकरा लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त; मुंबई मार्गे बारामती सिगारेटचा साठा

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात नामांकित ब्रँडच्या नावाचा गैरवापर करून बनावट ‘गोल्ड फ्लेक’ सिगारेटची विक्री करणाऱ्या टोळीचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आयटीसी कंपनीच्या ट्रेडमार्कचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटवर कारवाई करत पोलिसांनी तब्बल ११ लाख ३२ हजार रुपयांच्या बनावट सिगारेटचा साठा आणि केरी पिकअप वाहन जप्त केले.

या प्रकरणी चौघांविरोधात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी योगेश वेदवंतसिंग तोमर डेप्युटी मॅनेजर, अन्वेष आयपीआर सर्विस, बंगळुरू यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी जाकीर अल्लाउद्दीन शेख, रियाज अयुब खान, हुजैफ फिरोज बागवान आणि पप्पू निशाद यांच्याविरोधात कॉपीराईट अधिनियम अंतर्गत बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीनुसार श्रीरामनगर परिसरात एमएच-४२ ए कयू ६६१७ क्रमांकाच्या केरी पिकअपवर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान वाहनातून ‘गोल्ड फ्लेक किंग’ आणि ‘गोल्ड फ्लेक लाईट १०७ या नावाने विक्रीसाठी ठेवलेला मोठ्या प्रमाणातील बनावट सिगारेटचा साठा आढळून आला. यामध्ये ५० बॉक्स ‘गोल्ड फ्लेक किंग’, १३० बॉक्स ‘गोल्ड फ्लेक लाईट १०७ आणि केरी पिकअप वाहन असा एकूण ११.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत हा बनावट माल मुंबईहून बारामतीत विक्रीसाठी आणण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार यशवंत द्यानदेव पवार करीत आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D