बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याचा अंतिम ऊस दर ३,६५० रुपये प्रति टन जाहीर; ऊस उत्पादकांना दिवाळी भेट
सभासदांच्या उसाला ३,६५०; बाहेरील ऊस उत्पादकांना ३,४०० रुपये! माळेगावचा अंतिम दर जाहीर

बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याचा अंतिम ऊस दर ३,६५० रुपये प्रति टन जाहीर; ऊस उत्पादकांना दिवाळी भेट
सभासदांच्या उसाला ३,६५०; बाहेरील ऊस उत्पादकांना ३,४०० रुपये! माळेगावचा अंतिम दर जाहीर
बारामती | प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मागील गाळप हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाला अंतिम ऊस दर ३,६५० रुपये प्रति टन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक सभासदांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे.
कारखान्याने आतापर्यंत ऊस उत्पादक सभासदांना ३,५०० रुपये प्रति टन अदा केले आहेत. आता अंतिम दरानुसार दिवाळीसाठी त्यांना अधिकचे १५० रुपये प्रति टन मिळणार आहेत.
त्याचप्रमाणे गेटकेन ऊस उत्पादकांना आतापर्यंत ३,३०० रुपये प्रति टन अदा करण्यात आले असून, दिवाळीसाठी त्यांना अधिकचे १०० रुपये प्रति टन देण्यात येणार आहेत. त्यामुळे गेटकेन धारकांना एकूण ३,४०० रुपये प्रति टन दर मिळणार आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रावहिनी पवार यांच्या सूचनेनुसार अंतिम ऊस दर जाहीर करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष नितीनकुमार शेंडे यांनी दिली.
अंतिम दर जाहीर झाल्याने माळेगाव कारखान्याशी संबंधित ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.






