कोरोंना विशेष

बारामतीकरांसाठी फर्निचरची नवी पर्वणी! ‘रॉयल ओक’च्या नवीन दालनाचे सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन

जगभरातील डिझाईन्स आता बारामतीत!

बारामतीकरांसाठी फर्निचरची नवी पर्वणी! ‘रॉयल ओक’च्या नवीन दालनाचे सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन

जगभरातील डिझाईन्स आता बारामतीत!

बारामती वार्तापत्र 

बारामती दिमाखदार इमारतीत रॉयल ओक फर्निचरच्या नवीन दालनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी त्यांनी संपूर्ण दालनाची पाहणी करून संचालक व व्यवस्थापनाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, विविध देशांमधील वेगवेगळ्या पद्धतीचे आणि आकर्षक डिझाईन्सचे फर्निचर आता बारामतीतील नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तसेच हे फर्निचर योग्य दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याने नागरिकांनी या नवीन दालनाला एकदा अवश्य भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

उद्घाटनानंतर सुनेत्रा पवार यांनी दालनातील विविध फर्निचरची पाहणी केली. घर, कार्यालय तसेच विविध गरजांसाठी उपलब्ध असलेल्या फर्निचरच्या विविध प्रकारांची त्यांनी माहिती घेतली.

या उद्घाटनप्रसंगी बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, तालुकाध्यक्ष संदीप बादल, शहराध्यक्ष किरण इंगळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भोरी समाजातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी रॉयल ओकच्या नवीन दालनाचे कौतुक करत संचालक व व्यवस्थापनाला शुभेच्छा दिल्या. बारामती शहराच्या वाढत्या गरजा आणि बदलती जीवनशैली लक्षात घेता अशा प्रकारचे आधुनिक फर्निचर दालन शहरात उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठी सुविधा मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Back to top button