राहाता तालुक्यातील तरूणांचे साईनाथ रक्तपेढीत उस्फूर्त रक्तदान

प्रतिनिधी

शिर्डी : शिर्डी येथील साईनाथ रक्तपेढीत तालुक्यातील तरूणांनी उस्फूर्तपणे सोशल डिस्टनसिंगच्या साह्याने रक्तदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला, नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांनी उपस्थित दर्शविली त्यामध्ये राहाता नगरपरिषद कर्मचारी, लायन्स क्लब राहाता,साई योगा मंडळ राहाता आणि भारतीय जैन संघटना शिर्डी व इतर.
आज सकाळी 9 वाजल्यापासून नियोजित वेळेप्रमाणे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तरुण उपस्थित झाले योग्य नियोजनबद्ध कार्यक्रम रुपरेषा असल्याने रक्तपेढीतील कर्मचार्‍यांना आपले काम सुलभ रित्या पार पाडता आले. रक्तदान शिबिराचे आयोजनाबाबत रक्तपेढीच्या प्रमुखांनी विशेष कौतुक केले. उपस्थितांमध्ये मोहन गाडेकर, दिपक दंडवते, अनिकेत तुपे, विनोद गाडेकर, रोनक धाडीवाल, रोहीत पारख, राहुल समदडीया, नितिन दिवटे, पुंड सर, सुभाष दंडवते, विजय गाडेकर, अनिल कुंभकर्ण, संदीप भुजबळ, अमोल कटके आणि भारत साबदेसर व इतर रक्तदाते यांची उपस्थिती होती. तसेच ज्यांनी अजुनही रक्तदान केले नाही अश्या तरूणांना रक्तदानाचे आवाहन यांच्या माध्यमातून करण्यात आले आपल्या जवळच्या रक्तपेढीत जाऊन लवकरात लवकर रक्तदान करा. रक्तदान श्रेष्ठदान.

Check Also
Close
Back to top button