मुंबई

शिवसेना फायरब्रँड नेते खासदार संजय राऊतांविरोधात ईडीची मोठी कारवाई;८ भूखंड आणि १ फ्लॅट जप्त

राज्याचं राजकारण तापलं आहे.

शिवसेना फायरब्रँड नेते खासदार संजय राऊतांविरोधात ईडीची मोठी कारवाई;८ भूखंड आणि १ फ्लॅट जप्त

राज्याचं राजकारण तापलं आहे.

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. राऊत यांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याबरोबर ८ भूखंड आणि मुंबईच्या दादर परिसरातील एक फ्लॅट देखील ईडीने जप्त केला आहे. 1034 कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

याच प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली होती. दरम्यान, संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीला गेले आहेत.

काय आहे प्रकरण?

गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचं काम देण्यात आलं होतं. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या साथीनं या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर भागातील या झोपडपट्टीचं काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. हा व्यवहार तब्बल 1000 कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

वर्षा राऊत यांच्या बँक खात्याची चौकशी – आतापर्यंत केलेल्या मनी ट्रेल तपासात असे समोर आले आहे की, एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे 100 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. ही रक्कम प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली होती. 2010 मध्ये गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी 55 लाख रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाल्याचेही उघड झाले आहे. वर्षा राऊत संजय राऊत यांच्या पत्नी आहेत.

Related Articles

Back to top button