स्थानिक

बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात तक्रार आरोग्य संचालनालयाकडेही धाव घेणार

प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी

बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात तक्रार आरोग्य संचालनालयाकडेही धाव घेणार

प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी

बारामती वार्तापत्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात वैद्यकीय अधिष्ठातांकडे तक्रार करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणातील सर्व पुरावे संकलित करून आरोग्य संचालनालय, मुंबई येथेही तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी दिली.

यावेळी बोलताना नवनाथ बल्लाळ यांनी संबंधित प्रशासकीय कामकाजाबाबत गंभीर आक्षेप नोंदवत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. तसेच सर्व कागदपत्रे आणि पुरावे आरोग्य संचालनालयाकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी नगरसेवक बिरजू मांढरे, अभ्यंगत मंडळाचे सदस्य, माजी नगरसेवक समीर चव्हाण, गौरव अहिवळे, निलेश मोरे आणि संकेत शिंदे उपस्थित होते.

दरम्यान, या तक्रारीबाबत रुग्णालय प्रशासन किंवा संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

Back to top button